IMD Warning : महाराष्ट्रासह 'या' किनारपट्टीला हवामान विभागाचा इशारा, "गुरुवारपासून... "

पुढारी ऑनलाईन: मान्सूनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली नाही. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पुढील काही तासांत त्याचे चक्रिवादळात रूपातर होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर गुरूवार दि.८ जूनपासून शनिवार दि. १० जूनपर्यंत महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि गोवा किनापट्टीवरील समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याचा वेग वाढणार असून किनारपट्टीच्या भागात सावधतेचा इशारा (IMD Warning) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
8, 9, 10 June ला कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता.
नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता.मच्छिमारांनी क्षेत्रात जाऊ नयेhttps://t.co/Bt1OMDfC2t pic.twitter.com/TAK27ViMMW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
केरळमध्ये १ जूनला दाखल होणारा मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. मान्सूनवर सध्या चक्रिवादळाचे सावट आहे. त्यामुळे मान्सून लांबणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली आहे. दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ ११ जूनपर्यंत आणखी तीव्र (IMD Warning) होणार असून, दरम्यान किनारपट्टीवर १४५ ते १५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचे देखील हवामान विभागाकडून आज (दि.०६) देण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढच्या २४ तासांत अरबी समुद्रात हे चक्रीवादळ निर्माण होणार असून, हळूहळू हे वादळ तीव्र होणार आहे. दरम्यान ८,९ आणि १० जून ला नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीचा समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. दरम्यान या भागात वाऱ्याचा वेग ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे मच्छिमाऱ्यांनी या क्षेत्रात जाऊ नये (IMD Warning) , असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.