पिंपळनेर : अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा बलात्कार ; पाच जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपळनेर : अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा बलात्कार ; पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील भोनगाव येथील दोन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना रात्री एकच्या सुमारास घडली.

रविवारी (दि.4) रात्री एकच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी उठली असता किशोर पंडीत सूर्यवंशी, छोटू ऊर्फ प्रशांत रतीलाल बागूल दोघे (रा. सावरपाडा) या दोघा नराधमांनी तिचे हात धरून चेतन भटू बागूल आणि संदेश रामदास साबळे दोघे (रा. सावरपाडा) यांनी पाय धरून शेतालगत असलेल्या गोविंदा सुका गायकवाड यांच्या विहीरीजवळील निंबाच्या झाडाखाली बळजबरीने उचलून नेले. याठिकाणी छोटू ऊर्फ प्रशांत रतीलाल बागूल व चेतन भटू बागूल या दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने आरडाओरड केला. मात्र, जयेश नेहरू सूर्यवंशी हा अत्याचार होत असल्याचे पाहून त्या ठिकाणाहून निघुन गेला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात पाच संशयिता विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पाटील, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, आर. व्ही. निकम यांनी भेट घेत माहिती जाणून घेतली. आर. व्ही. निकम पुढील तपास करित आहेत.

हेही वाचा:

Back to top button