नाशिक : आपत्कालीन कक्षात ७०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या | पुढारी

नाशिक : आपत्कालीन कक्षात ७०० कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला महापालिकेने वेग दिल्यानंतर आता आपत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तीन सत्रांत नियुक्त्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन परिस्थिती नियोजन पूर्वआढावा बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या ७०० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आपत्कालीन सेवा तीन सत्रांत निश्चित करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (सेवा) भाग्यश्री बानायत यांनी काढले आहेत.

पावसाळ्यात झाडे तसेच जुने वाड्यांची पडझड होऊन मनुष्यहानी होत असल्याच्या घटना समोर येत असतात. या घटना घडू नयेत, याकरिता महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला नेहमीच सज्ज रहावे लागते. याबाबत राज्य सरकारनेदेखील सूचना केल्या असून, महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन सत्रांत कामकाज चालणार आहे. प्रथम सत्रात सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत, दुसऱ्या सत्रात दुुपारी २ ते रात्री १० पर्यंत तर तिसऱ्या सत्रात रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कामकाज चालणार आहे. पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडत असल्याने, दुर्घटनाग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्याच्या हेतूने या कक्षात कामकाज चालणार आहे.

हेही  वाचा :

Back to top button