ACP दिव्याचा म्हणजेच नेहा खान हिचा हॉट अंदाज; फोटो व्हायरल - पुढारी

ACP दिव्याचा म्हणजेच नेहा खान हिचा हॉट अंदाज; फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री नेहा खान देव माणूस मालिकेमुळे फार चर्चेत होती. सध्या झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने प्रक्षकांची रजा घेतली आहे. नेहा खानने या मालिकेत पोलिस अधिकाऱ्याची भूमीका केली आहे. नेहा अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे.

देवमाणूस मालिकेत येण्यापूर्वी ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात अभिनेत्री नेहा खान ने भाग घेतला होता. सध्या ती कोणत्याच शो मध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. नूकतेच तिने इन्स्टाग्रावर फोटो शेअर केले आहेत.

नेहा खान नेहमी निरनिराळे डान्स व्हिडिओ तसेच फोटोज ती शेअर करत असते. मध्ये तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता.

नेहाचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम आहेत.

 

नेहा ही मूळची अमरावतीची आहे. अभिनेत्री होण्यासाठी नेहा खान ने खूप कष्ट घेतले आहेत. देवमाणूस या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षाकांना आवडला आहे. या मालिकेनंतर पुढ ती शो मध्ये दिसलेली नाही. सोशल मीडियावर तिने तिचे जीम मधील फोटो शेअर केले आहेत.

Back to top button