Road accident: गेल्या वर्षभरात राज्यात १५ हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू | पुढारी

Road accident: गेल्या वर्षभरात राज्यात १५ हजारांहून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या वर्षभरात २०२२ मध्ये राज्यात १५ हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात (Road accident)  मृत्यू झाला आहे. यापैकी ५७ टक्के हे दुचाकीचालक होते, तर २१ टक्के पादचारी असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ पर्यंत राज्यात ४९२२ लोकांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. जवळपास ६,८४५ लोक रोड अपघातात जखमी (Road accident) झाले असल्याचे देखील महाराष्ट्र पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यात जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२३ या सव्वापाच वर्षांच्या कालावधीत १ लाख ६७ हजार ७०० रस्ते अपघातांमध्ये (Road accident) ७१ हजार ३१९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकीचालकांचा समावेश असून, पादचाऱ्यांच्या मृत्यूचेही प्रमाण लक्षणीय आहे.

हेही वाचा:

Back to top button