Cheese Paratha Recipe : मुलं आवडीने खातील, बनवा चीज मसाला पराठा | पुढारी

Cheese Paratha Recipe : मुलं आवडीने खातील, बनवा चीज मसाला पराठा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोज रोज नवं काय नाश्त्याला बनवावं, हा रोजचाच विचार असतो. (Cheese Paratha Recipe) अगदी कमी वेळेत नाश्ता बनवायचा तरी कसा आणि तो कसा बनवायचा असा प्रश्न नेहमीच पडत असतो. त्यात मुलांना चपाती, पोहे, शिरा नको असतो. मग त्यांना काय खाऊ करून द्याल. यासाठी आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे-चीज मसाला पराठा रेसिपी. स्टफ पराठा कुणाला खायला आवडणार नाही. मुलंदेखील अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. (Cheese Paratha Recipe)

चीज मसाला पराठा रेसिपीसाठी साहित्य

गव्हाचे पीठ/मैदा

पाणी

चीज खिसलेला

तेल

मीठ

बारीक चिरलेली कोथिंबीर

चाट मसाला

गरम मसाला

उकडलेले बटाटे

हिरवी मिरची

चिमुटभर साखर

कृती-

चीज पराठासाठी सर्व प्रथम एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे, मीठ, साखर, कोथिंबीर, गरम मसाला, हिरवी मिरची, चाट मसाला, खिसलेले चीज सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका आणि मऊ पीठ मळून घ्या. आता पीठाचे समान गोळे करून घ्या. पोळपाटवर एक गोळा घेऊन गोलाकार चपाटी (छोटी) लाटून घ्या.

लाटलेल्या छोट्या चपातीत वरील मिश्रण (हवे तेवढे घेऊन) घ्या. मसाला कव्हर होईल अशी चपाती दुमडून घ्या. (चपाती घट्ट चिटकवून घ्या. म्हणजे मसाला बाहेर येणार नाही) आता हा गोळा गव्हाचे पीठ लावून हळूवारपणे लाटून घ्या.

दुसरीकडे तवा गरम व्हायला ठेवा. आता तव्यावर एक टेबलस्पून तेल लावून घ्या. त्यावर ही चपाती चांगली भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी तांबूस रंग येऊपर्यंत भाजून घ्या.

दही, सॉस, टोमॅटो केचअपसोबत गरम गरम पराठा खायला घ्या. मुलांना हा पराठा नक्की आवडेल.

Back to top button