Amravati Accident : रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार | पुढारी

Amravati Accident : रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या धडकेत काका पुतण्या ठार झाले आहेत. ही दुर्घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे झाली.  सुधाकर बन्सी तेलंगे ( वय.५५) व मंगेश नारायण तेलंगे (वय.२८) रा. मोहम्मदपुरा अशी दुर्दैवी काका- पुतण्याची नावे आहेत. (Amravati Accident)
पोलिसांच्या माहितीनूसार, धामणगाव येथील सुधाकर बन्सी तेलंगे ( वय.५५, रा. मोहम्मदपुरा ) हे  मध्यरात्री अचानक बाहेर गेल्याने त्यांना रेल्वे स्थानक परिसरात शोधण्यासाठी त्यांचे पुतणे मंगेश नारायण तेलंगे (वय.२८) हे शोधायला गेले.  त्यावेळेस भुसावळ कडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक गाडी आली. या धडकेत हे दोघेही ठार झाले.

Amravati Accident : अविवाहित मंगेशवर होता कुटूंबाचा भार 

सुधाकर हा बांधकाम कामगार होता. त्याच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुली व दोन मुले असा परिवार आहे तर अविवाहित असलेला मंगेश हा पेंटर काम करीत होता. त्याच्यामागे दिव्यांग वडील, वृद्ध आई ,मानसिक आजारी असलेली बहीण व तिच्या दोन मुली असा परिवार आहे. मंगेशच्या मिळकतीवर कुटूंब दैनंदिन जीवन चालत होतं. रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास  करीत आहेत.
हेही वाचा 

Back to top button