Stock Market Opening | सेन्सेक्स तेजीत, शेअर बाजारात सुरुवातीला ‘या’ शेअर्सची दमदार सलामी | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स तेजीत, शेअर बाजारात सुरुवातीला 'या' शेअर्सची दमदार सलामी

पुढारी ऑनलाईन : जागतिक संकेत संमिश्र आहेत. तसेच देशांतर्गत महागाई आटोक्यात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ६२,२०० वर पोहोचला. तर निफ्टी (nifty today) १८,३६० वर व्यवहार करत आहे. (Stock Market Opening)

सेन्सेक्सवर (bse sensex today) टाटा मोटर्सचा शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर ५ टक्क्यांनी वाढला आहे. टाटा मोटर्सने चौथ्या तिमाहीत ५,४०७ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. यामुळे त्यांचे शेअर वधारले आहेत. एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, एल अँड टी, नेस्ले, इन्फोसिस, एचयूएल आणि टेक महिंद्रा हे शेअर्सदेखील वधारले आहेत.

इंडसइंड बँक, टाटा स्टील, मारुती, एसबीआय, सन फार्मा आणि ICICI Bank हे लाल चिन्ह्यात खुले झाले आहेत. आज निफ्टी ऑटो वाढल्याचे दिसून येत आहे. निफ्टीही आयटीही वाढला आहे. तर बँक, मीडिया, मेटल, फार्मा आणि हेल्थकेअर स्टॉक्स घसरले आहेत.

दरम्यान, आशियातील शेअर बाजारांनी (asian stock market today) सोमवारी सावधपणे सुरुवात केली आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा विस्तृत निर्देशांक ०.१६ टक्के खाली आला. तर जपानच्या Nikkei सुरुवातीच्या व्यवहारात वाढला. (Stock Market Opening)

 हे ही वाचा :

Back to top button