परभणी : गटसाधन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा विसर; संभाजी ब्रिगेडची कार्यवाही करण्याची मागणी | पुढारी

परभणी : गटसाधन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा विसर; संभाजी ब्रिगेडची कार्यवाही करण्याची मागणी

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गटसाधन केंद्रात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली नसल्याचा प्रकार संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी उघड केला. याप्रकरणी रविवारी (दि. १४ मे) दुपारी १ वाजेच्या सुमारास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी  करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी परिपत्रक काढून राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती, राष्ट्रीय दिन शासकीय-निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याचे आदेश दिलेले असतात. मात्र तरी देखील अनेक शासकीय कार्यालयात जयंती उत्सव साजरे होताना दिसत नाहीत. शिवाय अनेक कार्यालयात महापुरुषांचे फोटो उपलब्ध नसतात परिणामी जयंती उत्सव साजरा होत नाहीत असाच प्रकार संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघड केला आहे. यात शहरातील गटसाधन केंद्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली असता कार्यालयास कुलूप असल्याचे आढळुन आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अँड माधव दाभाडे यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते बाहेर गावी आहे, दुपारी दोन वाजेपर्यंत जयंती साजरी करणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना फोनवर तक्रार करण्यात आली. याबाबत चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे विजय पाटील, सोपान धापसे, पिंटू रोकडे, पिंटू डोंबे, बाबाराव डोंबे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शिक्षणाचे धडे देणाऱ्या कार्यालयातच महापुरुषांची जयंती साजरी होत नसेल तर इतर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक कुणाचा आदेश पाळत असतील हे समजणे अवघड आहे

मी बाहेरगावी आलो असल्यामुळे जयंती साजरी करण्यात आली नाही. मी स्वतः 2 वाजेनंतर येणार असून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत
– गणेश गाजरे गटशिक्षणाधिकारी जिंतूर

यावर्षीच्या राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिशिष्टात 17 व्या क्रमांकावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचे आदेश आहेत, मात्र दुपार पर्यंत गटसाधन केंद्रात जयंती साजरी करण्यात आली नव्हती म्हणून संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यवाही करावी.
-अँड माधव दाभाडे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष

हेही वाचा

Back to top button