सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, सरकार… | पुढारी

सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, सरकार...

पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच राज्यातील काही राजकीय पंडीत आणि काही पत्रकार यांनी निर्णय दिला. पुढचे सरकारही तयार करून टाकले. मला वाटतं हे योग्य नाही. शांतपणे निर्णयाची वाट पाहावी, आम्ही पूर्णपणे आशादायी आहे. काही होणार नाही. आम्ही सर्व कायदेशीर केले आहे, त्यामुळे योग्य निर्णय येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्धा येथे आज (दि.१०) ते माध्यमांशी बोलत होते.

खरीप आढावा बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पेरणीसाठी शेतकऱ्यांना योग्य बियाणं उपल्बध करून दिली जातील. पेरणीसाठी पुरेशी बियाणे आहेत. तरीही बाहेरून घेत असलेल्या बियाणांची गुणवत्ता तपासण्याच्या सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणांची पावती जपून ठेवावी. बियाणे घेतल्यानंतर त्याच्यात फसवणूक झाली तर भरपाई मिळते, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शिवाय बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी खटला भरला जाईल, असा इशाराही फडवीस यांनी विक्रेत्यांना दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button