Deepika Padukone : ट्विटरवर दीपिका- आलियाची चर्चा; मेटगालानंतर दोन अभिनेत्रींची एकमेंकीशी तुलना | पुढारी

Deepika Padukone : ट्विटरवर दीपिका- आलियाची चर्चा; मेटगालानंतर दोन अभिनेत्रींची एकमेंकीशी तुलना

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ने ‘मेट गाला २०२३’ (Met Gala २०२३) मध्ये प्रेग्नसीनंतर पहिल्यादा डेब्यू केला. प्रेग्नसीनंतर ती पहिल्यांदाच रेड कॉर्पेटवर दिसल्याने आलियाच्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. परंतु, यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ट्विटर ट्रेंडवर आली आहे. आलिया आणि दीपिकाची का चर्चा होत आहे? याबाबतची माहिती समोर आली आहे.

वास्तविक, मेट गाला २०२३ मध्ये आलिया भट्ट रेड कॉर्पेटवर येण्यापूर्वी दीपिकाने तिच्या ऑस्कर (२०२३) शी संबंधित काही BTS फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना दीपिकाचा मोठ्या पडद्यावरील करिअरला आलिया ठक्कर देण्यास सज्ज होत आहे की काय? असा प्रश्न सोशल मीडियावर पडला आहे. आलियाने प्रेग्नसीनंतर थेट मेट गालामध्ये दमदार हजेरी लावल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पंरतु, दरम्यान काही नेटकरी दीपिकाला असुरक्षित असल्याचे म्हणत आहेत. यामुळे आलिया नव्हे तर दीपिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

दरम्यान दीपिकाने ( Deepika Padukone ) आलिया भट्टचा तिरस्कार करणारे अकाउंट फॉलो केल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचे एक ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे टविट समोर येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि ती ट्विटर ट्रेंडवर आली. तर दुसरीकडे ट्विट व्हायरल झाल्यानंतर दीपिकाने ते खाते अनफॉलो केल्याची माहिती मिळत आहे.

तर एका युजर्सने दीपिका अकाऊंट फॉलो करत असल्याचा दावा करत त्याच्या बॅकअप खात्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट काही वेळातच व्हायरल झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून नेटकरी दीपिका पदुकोणला ट्रोल करत आहेत.

दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती ऋतिक रोशनसोबतच्या ‘फायटर’ मध्ये दिसणार आहे. दीपिका ‘पाइपलाइन’ आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘द इंटर्न’ चा रिमेकमध्येही दिसणार आहे. याशिवाय दीपिका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button