’मुख्यमंत्री केसरी’च्या शर्यतीत गायकवाड यांचा बैलगाडा प्रथम | पुढारी

’मुख्यमंत्री केसरी’च्या शर्यतीत गायकवाड यांचा बैलगाडा प्रथम

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील वाडकरमळा येथे ‘मुख्यमंत्री केसरी : 2023 बैलगाडा शर्यत’ आयोजित केली होती. यात जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकाविला. निसर्ग गार्डन कात्रज या बैलगाड्याने द्वितीय, तर नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ यांच्या बैलगाड्याने तृतीय क्रमांक पटकाविला.

या शर्यतीत बकासुर, सुंदर, बलमा, रायफल, सरदार आदी नामांकित बैल सामील झाले होते. माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. विजेत्या बैलगाडामालकांना ट्रॅक्टर, बुलेट, दुचाकी आदी बक्षिसांचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चतुर्थ क्रमांक पीरसाहेब प्रसन्न सुभाष दादा मोडक यांच्या बैलगाड्याने पटकाविला. पाचवा क्रमांक श्रीकन्या प्रमोदशेठ घुले पाटील यांच्या बैलगाड्याने, तर सहावा क्रमांक जीवन भानगिरे यांच्या बैलगाड्याने पटकाविला.

महाराष्ट्राची ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेला जपण्याचे काम भानगिरे यांच्याकडून होत असून, ते कौतुकास्पद असल्याचे गौरद्गार या वेळी पाटील यांनी काढले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवासेना संपर्कप्रमुख किरण साळी, शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, भागवत बाणखेले, माजी नगरसेवक सम्राट थोरात, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, संजय डोंगरे, शंकर कांबळे, सोपान लोंढे, गोरख घुले, संदीप मोडक आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button