commercial LPG cylinder rate : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल; जाणून घ्या नवे दर
पुढारी ऑनलाईन डेस्क : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. आजपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १७१.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये २९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १८५६.५० रुपये असणार आहे.
Oil marketing companies have revised the prices of commercial LPG gas cylinders. The rate of 19 KG commercial LPG gas cylinders has been slashed by Rs 171.50 with effect from today. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder is Rs 1856.50 from today: Source pic.twitter.com/fFtlLsaygh
— ANI (@ANI) May 1, 2023
1 मे २०२३ म्हणजेच कामगार दिनादिवशी सरकारने एलपीजी सिलेंडरचे दरात कपात केली आहे. या कपातीमुळे अनेक शहरांमधील गॅस सिलेंडरचे दर बदलणार आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर घटले आहेत. १४.२ किलोच्या घरगुती गॅसच्या दरात मात्र सध्या कोणतेही बदल झालेले नाहीत. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १८५६.५० रूपये झाली आहे. मुंबईमध्ये १८०८.५० रूपये आणि चेन्नईमध्ये २०२१.५० रूपये आहेत. नवीन दर तेल कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर अपडेट केले आहेत.
हेही वाचा :
- राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमुळे यंत्रणेवर ताण
- मराठवाड्यातून पुणेमार्गे मुंबई गाठण्यासाठी शिरूर खेड-कर्जत नवा रस्ता
- सौरऊर्जेशी संबंधित अभ्यासक्रमांची क्रेझ !