नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची मिमिक्री; संजय राऊतांवरही टीकास्त्र | पुढारी

नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची मिमिक्री; संजय राऊतांवरही टीकास्त्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी माणसांच हित म्हणणे राऊतांच्या तोंडी शोभत नाही. बारसूमधील लाठीचार्जचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नव्हते, कलानगर आणि मातोश्रीवरून लाठीचार्जचे आदेश आले होते. संजय राऊतांच्या पत्राचाळ घोटाळ्यामुळे मराठी लोकांना बेघर व्हाव लागलं, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंच्या आवाजाची मिमिक्री करत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

सामनातील आग्रलेखावरून नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबिय आणि खासदार राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, संजय राऊतांच प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. राऊतांनी पत्राचाळीत जाऊन दाखवावं लोक त्यांचा निषेधच करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मॉरीशसला बोलावलं जातं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना भिवंडीला पण बोलावलं जात नव्हतं. बारसूमधील लाठीचार्जचे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले नव्हते. तर ते कलानगर आणि मातोश्रीवरून आले होते. राऊत पाकिस्तानचे एजंट आहेत. त्यांच्यामुळे पत्राचाळीतील लोकांना बेघर व्हाव लागलं. त्यांनी पत्राचाळ मध्ये जाऊन दाखवाव, लोक त्यांचा निषेधच करतील. मराठी माणसाचं हित राऊतांच्या तोंडी शोभत नाही. बारसूतील लोकांची भावना प्रकल्पाच्या बाजूने आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button