पिंपळनेर : इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड | पुढारी

पिंपळनेर : इफ्तार पार्टीतून एकात्मतेचा संदेश :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी इफ्तार पार्टीप्रसंगी सांगितले.

पिंपळनेर रमजान www.pudhari.news
पिंपळनेर : इफ्तार पार्टीत संवाद साधताना जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड.

पिंपळनेर पोलीस ठाणे व राजे छत्रपती मार्शल आर्टस् इंग्लिश पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.20) रात्री शहरात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पोलिस अधीक्षक यांनी संवाद साधला. ते म्हणाले मुस्लीम बांधवांनी समाजात शांतता, देशात कोरोनासारखे संकट येऊ नये तसेच अमन व शांती कायम अबाधित रहावी यासाठी प्रार्थना केली. हिंदू-मुस्लीम भाईचारा कायम असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत उपविभागीय पोलिस अधीकारी प्रदिप मैराळे, बाबा पठाण, पांडुरंग सूर्यवंशी यांनी मुस्लीम बांधवांसह सर्वांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, प्र. तहसिलदार गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुधामती गांगुर्डे, धीरज अहिरे, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे, मा. सभापती संजय ठाकरे, सुरेंद्र मराठे, शाम कोठावदे, पांडुरंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर एखंडे, संभाजी अहिरराव, जुहूर जहागिरदार, हाजी. जावेद सैय्यद, योगेश नेरकर, सतिश शिरसाठ, योगेश बधाण, मोहम्मदीभाई बोहरी, ए. बी. मराठे, जे. टी. नगरकर, युनुस तांबोळी, डॉ. मोहसिन शेख, नौशाद सैय्यद, लियाकत सैय्यद, अयुब पठाण, जगदीश ओझरकर, अविनाश पाटील, सतीश पाटील, रिखब जैन, किरण कोठावदे, रा. ना. पाटील यांच्यासह मुस्लिम नेते व नागरिक उपस्थित होते. पिंपळनेर पोलीस ठाणे व राजे छत्रपती इंग्लिश मार्शल आर्ट संस्थेच्या वतीने इफ्तारच्या वेळी रोजाचा उपवासनिमित्त फळे, मिठाई व जेवणासाठी प्रिती भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या व ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा व शांततेत साजरा करण्यासाठी हिंदू बांधव पूर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही संभाजी अहिरराव यांनी दिली.

पिंपळनेर रमजान www.pudhari.news
पिंपळनेर : इफ्तार पार्टीप्रसंगी उपस्थित उपविभागीय पोलिस अधीकारी प्रदिप मैराळे, बाबा पठाण, पांडुरंग सूर्यवंशी, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे आदी मान्यवर. (सर्व छायाचित्रे: अंबादास बेनुस्कर)

हेही वाचा:

Back to top button