गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट | पुढारी

गौतम अदाणी यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर घेतली भेट

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : विरोधकांच्या निशाण्यावर असलेले उद्योगपती गौतम अदाणी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र नेमकी काय चर्चा झाली हे अद्यााप समजू शकले नाही.

एका अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच या आरोपाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी यासाठी विरोधक आक्रमक आहेत. मात्र, शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेत जेपीसी चौकशीची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

पवारांनी अदानींचा बचावही केल्याने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये या मुद्यावरून तणातणी सुरु आहे. आता काँग्रेसकडून अदानी-पवार भेटीवर काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

.हेही वाचा 

वडगावातील नळ पाणीपुरवठ्याचे होणार ऑडिट

बारामती तालुक्यातील कोट्यवधीच्या विकासकामांना टक्केवारीचे ग्रहण

शिरूर : अचानक लागलेल्या आगीत घर भस्मसात

Back to top button