रायगड पुढारी वृत्तसेवा : "महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी आहे. संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते म्हणाले की, "नवी मुंबई मधील खारघर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जात आहे," असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
(रविवार)16 एप्रिल रोजी खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. तथापी या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून, 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा