Earthquake in Mizoram: ईशान्य भारत हादरला; मिझोरमला ४.७ रिश्टर भूकंपाचे धक्के | पुढारी

Earthquake in Mizoram: ईशान्य भारत हादरला; मिझोरमला ४.७ रिश्टर भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन: ईशान्य भारतातील मिझोरम राज्यात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाले. आज (दि.१०) सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के (Earthquake in Mizoram) बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मिझोरमधील चंफाई शहरापासून दक्षिण-पश्चिम १५१ किमी, १० किमी खोलीवर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अंदमान निकोबार बेटावरवरही धक्के

रविवारी (दि.१०) अंदमान आणि निकोबार बेटांवर अनुक्रमे ५.७ आणि ५.३ तीव्रतेचे दोन भूकंप झाले. पहिला भूकंप रविवारी (दि.१०) दुपारी ४ वाजून १ मिनिटांनी, तर दुसरा २ वाजून ५९ मिनिटांच्या सुमारास बेटावर भूकंपाचे धक्के जाणवले. याचा केंद्रबिंदू निकोबार बेटाजवळ १० किमी खोलीवर होता.

हेही वाचा:

Back to top button