Meta SAM : मेटाचे नवीन AI टूल SAM; जाणून घ्या भन्नाट फायदे | पुढारी

Meta SAM : मेटाचे नवीन AI टूल SAM; जाणून घ्या भन्नाट फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क: फेसबुकच्या मूळ मेटाने फोटो आणि व्हिडिओंमधील वस्तू शोधण्यास मदत करण्यासाठी सॅम (SAM – Segment Anything Model) नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल जारी केले आहे. कंपनीने या टूलला सेगमेंट एनीथिंग मॉडेल म्हणजेच SAM असे नाव दिले आहे. मेटाने सांगितले की SAM च्या रिलीजमुळे तंत्रज्ञानामध्ये आणखी भन्नाट गोष्टी पाहायला मिळतील.

मेटाने याबाबत सांगितले की, सॅम (SAM – Segment Anything Model) हे फोटो आणि व्हिडिओमधील वस्तु  ओळखू शकते. फिचरच्या या वैशिष्ट्यामध्ये हे समोर आले आहे की, ज्यांचा याच्याशी कधीच संबंध नव्हता अशा गोष्टीही त्यातून शोधल्या जातात. या नवीन एआय टूलच्या सहाय्याने,  एका चाचणीमध्ये फोटोमधून मांजर निवडण्यास सांगितले, तेव्हा या टूलने त्या सर्वांची निवड केली. त्यानंतर त्याने  योग्य निकाल म्हणजेच मांजर शोधून दाखवले. नवीन टूल  खूप उपयुक्त ठरेल कारण त्याच्या मदतीने युजर कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमधून कोणताही भाग थेट शोधू शकतात.

हेही वाचा

Back to top button