Breaking News : Facebook-Meta : फेसबुकची मूळ कंपनी मेटा करणार ट्विटर सारखे सोशल नेटवर्क लाँच, ट्विटरला देणार प्रतिस्पर्धा | पुढारी

Breaking News : Facebook-Meta : फेसबुकची मूळ कंपनी मेटा करणार ट्विटर सारखे सोशल नेटवर्क लाँच, ट्विटरला देणार प्रतिस्पर्धा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Facebook-Meta : फेसबुकची मूळ कंपनी मेटा लवकरच ट्विटर सारखे सोशल नेटवर्क लाँच करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे एलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरला आता फेसबुकच्या मालकीच्या मेटाकडून नवीन स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. एएनआय वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.

Facebook-Meta : एएनआयने म्हटले आहे, मेटा प्रवक्त्यांनी नुकतेच व्हरायटीला एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही टेक्स्ट माहितीचा मजकूर देण्यासाठी आणखी एका स्वतंत्र, विकेंद्रित सामाजिक नेटवर्कचा शोध घेत आहोत. आम्हाला असा विश्वास आहे क्रिएटर्स आणि सेलिब्रिटी, नेते यांसारख्या पब्लिक फिगर्स, यांना त्यांच्या रुचीनुसार माहिती अपडेट्स देता येईल… मेटाचे प्रतिनिधी म्हणाले सध्या तरी आम्ही इतकीच माहिती देऊ शकतो.

यासंदर्भात मनी कंट्रोलने प्रथम संभाव्य मेटा सेवेवर P92 या कोड नावाने अहवाल दिला आहे. नवीन मेटा अॅप हे मास्टोडॉनला शक्ती देणा-या फ्रेमवर्कवर आणि इंटर ऑपरेबल यावर आधारित असेल. गेल्या ऑक्टोबरमध्ये मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

Facebook-Meta : दरम्यान, मेटाने अलीकडेच ट्विटरच्या ब्ल्यू टिक व्हेरिफाइड सर्विसप्रमाणेच मेटा व्हेरिफाईडची सेवा आणण्यास सुरुवात केली आहे. मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी ब्ल्यू टिक चेक-मार्क बॅजची सेवा सुरू केली आहे, जी व्टिटरप्रमाणेच पेड आहे. Meta Verified ची किंमत वेबवर USD 11.99/महिना किंवा Apple च्या iOS वर USD 14.99/महिना आहे. कंपनीने सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा सुरू केली आहे. आणि लवकरच ही पेड सेवा अन्य देशांतही सुरू केली जाईल, असे मेटाचे अध्यक्ष आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी योजना जाहीर करताना सांगितले.

त्यामुळे येणा-या काळात लवकरच ट्विटरला फेसबुक मेटाच्या नवीन सोशल मीडिया नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा प्रतिस्पर्धी म्हणून सामना करावा लागू शकतो.

हे ही वाचा :

एसटी महामंडळाची झोळी रिकामीच; बजेटमध्ये जुन्या योजनांची नव्याने घोषणा

H3N2 विषाणूचा धोका वाढला, देशात ६ जणांचा मृत्यू, जाणून घ्या त्याची लक्षणे

Back to top button