Uttarakhand accident: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना; प्रवासी बस दरीत कोसळली, दोघींचा जागेवर मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

Uttarakhand accident: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना; प्रवासी बस दरीत कोसळली, दोघींचा जागेवर मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पुढारी ऑनलाईन: उत्तराखंडमध्ये मसुरी-डेहराडून मार्गावरून जाणारी प्रवासी बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन मुलींचा जागेवरच मृत्यू झाला. तर बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मसुरी पोलीसांनी दिली आहे.

मसुरी-डेहराडून रस्त्यावरून दरीत कोसळलेल्या बसमध्ये चालकांसह २२ प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button