महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘एप्रिल फुल’च्या धर्तीवर अनोखे आंदोलन | पुढारी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 'एप्रिल फुल'च्या धर्तीवर अनोखे आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क : एप्रिल फुलच्या निमित्ताने महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसतर्फे काल (दि.१) सोशल मिडीयावर अनोखे आंदोलन करण्यात आले. हॅपी जुमला डे या हॅशटॅगखाली भाजप आणि मोदी सरकारने न पाळलेल्या आश्वासनांना अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.

याबद्दल अधिक माहिती देताना राऊत म्हणाले, २०१४ पासून मोदी सरकाने नुसतीच आश्वासनांची खैरात केली असून यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही, उलट मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई, बेरोजगारीच यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जनतेला खोटी स्वप्ने दाखवून मोदी सरकार जनतेच्या भावनांशी खेळत असून या सरकरने दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंग यांनी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज, काळ पैसा या सर्वांची आठवण करून देणारे ट्विट केले असून पंतप्रधान मोदींसाठी प्रत्येक दिवस हा एप्रिल फुल असल्याची टीका केली. महाराष्ट्र प्रदेश समाज माध्यम प्रभारी झीनत शबरीन यांनी महागाई, नोकरी आणि आरोग्यावरून मोदी सरकारवर टीका केली असून मोदींचा विश्वगुरु भारत हा देखील जुमला असल्याचे सांगितले. या आंदोलनात महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या या अभियानाची सोशल माध्यमावर चांगलीची चर्चा रंगली आहे.

Back to top button