Uttarakhand in the shadow of crisis : उत्तराखंडात आणखी ‘5 जोशीमठ’ संकटाच्या छायेत

Uttarakhand in the shadow of crisis
Uttarakhand in the shadow of crisis
Published on
Updated on

डेहराडून; पुढारी वृत्तसेवा :  उत्तराखंडातील (Uttarakhand in the shadow of crisis) कर्णप्रयाग, श्रीनगर, नैनीताल, उत्तरकाशी, बागेश्वर या 5 जिल्ह्यांतील अनेक गावे जोशीमठप्रमाणे संकटाच्या छायेत आहेत. येथील लोकही बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. नैनीतालमध्ये तर सर्वांत बिकट स्थिती आहे. तेथील 3 भूभाग स्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत.

  • जोशीमठपासून (Uttarakhand in the shadow of crisis) 272 कि.मी.वर असलेल्या नैनीतालमध्ये अमर्याद बांधकामांमुळे नैनी सरोवराला फटका बसला तर पुराचे पाणी 43 कि.मी.वर असलेल्या हल्द्वानीपर्यंत हाहाकार उडवेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
  • जोशीमठपासून 83 कि.मी.वर असलेल्या कर्णप्रयागमध्येही 50 घरे खचली आहेत. घरांची बांधकामे अशा पद्धतीने झालीआहेत की, ड्रेनेजचे पाणी बाहेर न निघता तेथेच मुरते आहे.
  • जोशीमठपासून 146 कि.मी.वर असलेल्या श्रीनगरमधील रेल्वे बोगद्याच्या कामावरून वाद आहेत. बोगद्यासाठी केलेल्या स्फोटांत येथेही 30 घरांना भेगा पडल्या आहेत.थोडक्यात नवी बांधकामे हानीला कारण ठरत आहेत.
  •  जोशीमठपासून 286 कि.मी.वर असलेल्या भटवाडीखालून गंगा भागीरथी वाहते. वरच गंगोत्री हायवे आहे. नदी सरकल्याने हायवेचा एक भाग नदीखाली गेला, तर 50 घरेही पडली होती.
  • जोशीमठपासून 286 कि.मी.वर असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील 26 गावे अतिसंवेदशनशील श्रेणीत आहेत. येथेही घरांना भेगा पडण्याच्या, ती खचण्याच्या घटना नित्याच्या आहेत.
  • जोशीमठपासून 191 कि.मी.वर असलेल्या बागेश्वर जिल्ह्याची व्यथाही वेगळी नाही. बागेश्वर जिल्ह्यातील 48 गावे संकटात आहेत. कपकोट तालुक्यातील 28 गावांत दरवर्षी भूस्खलन होते. घरांना भेगा तरी पडल्या आहेत किंवा ती जमीनदोस्त तरी झालेली आहेत. जोशीमठ प्रमाणेच बागेश्वर जिल्हाही भूकंपप्रवण आहे. 2013 मधील प्रलयसदृश स्थितीनंतर गरुडमधील 9, कांडातील 3 गावे संकटाच्या छायेत आहेत. पाऊस झाला, की विस्थापित होणे ठरलेले असते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news