Tamil Nadu rain : तामिळनाडूत पावसानं हाहाकार, ५ जणांचा मृत्यू, दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं

Tamil Nadu rain : तामिळनाडूत पावसानं हाहाकार, ५ जणांचा मृत्यू, दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं
Published on
Updated on

चेन्नई : पुढारी ऑनलाईन

Tamil Nadu rain : तामिळनाडूला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. पावसाशी संबंधित घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून साडेदहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी १२ जिल्ह्यांतील निवारा केंद्रात हलवण्यात आलंय. चेन्नईतील ६५० लोकांना पाच निवारा केंद्रात हलवण्यात आलंय. अरियालूर, दिंडीगुल, शिवगंगा आणि तिरुवन्नमलई येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तुतीकोरीन आणि तिरुनेलवेली येथील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी आज शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, चेन्नईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. चेन्नईसह पाँडेचेरीत येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तामिळनाडूत 'ईशान्य मान्सून'चा पाऊस पडतो. पण तामिळनाडूत (Tamil Nadu rain) १ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान ७० टक्के अधिक पाऊस झाला आहे. तंजावर, नागापट्टणम, तुतीकोरीन आणि कुड्डालोर या भागात ११५.६ मिलिमीटर ते २०४.४ मिलिमीटर पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी १५२ जनावारांचा मृत्यू झाला आहे. तर ६८१ घरांची पडझड झाली आहे. पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शक्ती मिल बलात्कार प्रकरण : 7 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news