आता ३२ म्युटेशन्सचा नवा कोरोना स्ट्रेन! | पुढारी

आता ३२ म्युटेशन्सचा नवा कोरोना स्ट्रेन!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था ; दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना येथे आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी तातडीची बैठकही बोलावली. अवघ्या जगाने सतर्कता बाळगावी, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला.

यापूर्वी ब्रिटिश शास्त्रज्ञांनीही बोत्सवानामध्ये आढळलेल्या नव्या व्हेरियंटबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. या व्हेरियंटमध्ये 32 म्युटेशन झालेले आहेत, त्यामुळे त्यावर सध्या प्रचलित असलेली कुठलीही कोरोना प्रतिबंधक लस परिणामकारक ठरू शकत नाही. हा व्हेरियंट आपल्या ‘स्पाईक प्रोटिन’मध्ये बदल घडवून आणतो आणि त्यामुळे अत्यंत वेगाने त्याचा संसर्ग सुरू आहे.

हाँगकाँगपर्यंत या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येऊ लागलेले असल्याने भारतासाठीही हा व्हेरियंट धोक्याची बाब ठरणे शक्य आहे.
दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत या व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळून आले आहेत, असे या देशातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शिअस डिसिज’कडून सांगण्यात आले. शास्त्रज्ञांनी या स्ट्रेनचे नामकरण ‘बी. 1.1.529’ असे केले आहे.

नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनने दक्षिण आफ्रिका, नामीबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एसवाटिनी या आफ्रिकेतील सहा देशांतून येणारी विमाने परतविली आहेत. दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला आलेल्या दोघांना या व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जर्मनीने या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता चाचण्या वाढविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत येण्या-जाण्यावर बंदी घातली आहे.

  • राशिभविष्य (दि. २७ नोव्हेंबर २०२१)
  • आफ्रिकेत आढळलेल्या स्ट्रेनने मारली हाँगकाँगपर्यंत मजल
  • भारतातही अ‍ॅलर्ट! नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना
  • आफ्रिकेतील सहा देशांतून येणारी विमाने ब्रिटनने परतवली
  • ‘स्पाईक प्रोटिन’मध्ये बदल घडवून वेगाने फोफावतोय नवा स्ट्रेन
  • शास्त्रज्ञांकडून नव्या व्हेरियंटचे ‘बी. 1.1.529’ नामकरण
  • फ्रान्स, जर्मनीसह युरोपीय देशांतही कोरोनाचा हाहाकार

Back to top button