Indore temple stepwell collapse: इंदूरमधील मंदिर दुर्घटना प्रकरणात मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल; मृतांची संख्‍या ३५ वर | पुढारी

Indore temple stepwell collapse: इंदूरमधील मंदिर दुर्घटना प्रकरणात मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल; मृतांची संख्‍या ३५ वर

पुढारी ऑनलाईन: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरुवारी (दि. ३०) रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने भाविक पाण्‍यात पडले. यामधील मृतांची संख्या ३५ वर पोहचली आहे. या प्रकरणात मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आल्याचे इंदूर पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

इंदूर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत अनावधानाने खुनाचा गुन्हा मंदिर प्रशासनावर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती येथील पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सपना संगीता रोडवरील स्नेहनगर येथे मंदिरात होम सुरू असताना हा अपघात झाला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. विहिरीच्या छतावर ३० हून अधिक लोक बसले होते. अतिरिक्‍त वजनामुळे विहिरीचे छत कोसळून ३० हून अधिक भाविक ४० फूट खाली पडले.

इंदूरमधील मंदिरातील दुर्घटनेमुळे रामनवमीच्या दिवशीच ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धार्मिक कार्यक्रमालाच गालबोट लागले आहे. यामध्ये अजूनही १८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अद्याप एक व्यक्ती बेपत्ता आहे, अशी माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलायराजा टी यांनी दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button