नाशिक : नावा चषक स्पर्धेच्या जर्सीचे अनावरण | पुढारी

नाशिक : नावा चषक स्पर्धेच्या जर्सीचे अनावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा)च्या वतीने आयोजित व सम्राट ग्रुप प्रायोजित ‘नावा प्रीमियर लिग’ (एनपीएल) खेळाडूंसाठी मधुरा ग्रुपच्या सौजन्याने देण्यात येणार्‍या जर्सी (टी शर्ट्स)चे अनावरण मधुरा ग्रुपच्या प्रमुख संपदा हिरे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पगार तसेच सम्राट ग्रुपचे अविनाश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप हे असून, 1 व 2 एप्रिल रोजी सकाळी 8 पासून महात्मानगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे यू-ट्युबवरून लाइव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे. स्पर्धेत प्रत्येक संघाचे दोन सामने होणार असून, प्रत्येक ग्रुपमध्ये तीन असे बारा सामने होतील. त्यापैकी चारही ग्रुपमधील अव्वल एकच्या संघामध्ये उपांत्य सामना व अंतिम सामना होईल. एनपीएलचे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अ‍ॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वॉरियर्स व मीडिया अ‍ॅडव्हर्टायझिंग, गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्स, फूड्स पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझिंग, नवांकुर पब्लिसिटी, टॉस पार्टनर मयूर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझिंग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझिंग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषिदूत बायो हर्बल, ओेमपूजा इलेक्ट्रॉनिक, वेध न्यूज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासारखी बक्षिसे दिली जातात. जर्सी अनावरणाप्रसंगी स्पर्धा समिती प्रमुख रवि पवार, सचिन गिते व नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे-पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दीपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरेे, सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, श्याम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार तसेच ‘पुढारी’चे युनिट हेड प्रल्हाद इंदोलीकर, राम आढाव, सुशील झगडे व प्रवीण सचान, सुनील पाटील, चैतन्य बोडके, अबिद शेख, अभिजित गोरे, बंटी पवार, सचिन जैन, विजय क्षीरसागर, अमोल घावरे, सचिन कापडणी, सागर अहिरे, पंकज ठाकूर, अभय ओझरकर, रवि जन्नवार, सुहास भोसले, सचिन शिंदे, प्रफुल्ल पगार, प्रसाद चौधरी, श्रीराम शिंदे, प्रशांत नागरे आदी उपस्थित होते.

12 संघाचा सहभाग…
ए – ग्रुप              टाइम्स ग्रुप         पुण्यनगरी            दिव्य मराठी
बी – ग्रुप             लोकमत             सकाळ               देशदुत
सी – ग्रुप             लोकनामा           पुढारी                रेड एफ एम
डी – ग्रुप             रेडिओ मित        नावा                   जनस्थान

हेही वाचा:

Back to top button