Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : ना. दादा भुसे  | पुढारी

Nashik : प्रभु रामचंद्रांकडे देशाच्या प्रगतीसाठी साकडे : ना. दादा भुसे 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

महाराष्ट्र राज्यासह देशाची प्रगती होवो, असे साकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी (दि.३०) प्रभु रामचंद्र यांना घातले. यावेळी अयोध्येत प्रभु रामचंद्र यांचे आशिर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

रामनवमीनिमित्ताने ना. भुसे यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकचा रामजन्मोत्सवाचा सोहळा अभुतपूर्व असून देशाची प्रगती व्हावी. तसेच गरीबांना न्याय मिळावा, असे साकडे प्रभु रामचंद्र यांना घातले, अशी माहिती भुसे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, खासदार व आमदार हे नऊ एप्रिलला अयोध्येला जाणार आहे. या दौऱ्याबद्दल ना. भुसे यांना विचारले असता अयोध्येत नेहमी एक वेगळीच शक्ती मिळते. त्यामूळे प्रभु रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही अयोध्येत जात आहोत. शासनाचा कारभार चालविण्यासाठी प्रभु रामचंद्र यांच्या आशिर्वाद आम्हाला उपयोगी ठरेल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

तर आम्ही चाैकशी करू : भुसे

छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणामागे मास्टरमांईड शोधताना त्यामागे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता का? अशी शंका राज्याचे विरोधी अजित पवार यांनी व्यक्त केली. त्याकडे ना. भुसे यांचे लक्ष वेधले असता ना. पवार यांच्याकडे काही माहिती असल्यास ती त्यांनी शासनाला द्यावी. आम्ही त्यावर निश्चितच चौकशी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हेही वाचा : 

Back to top button