पन्हाळा सज्जा कोठी परिसरात वणवा | पुढारी

पन्हाळा सज्जा कोठी परिसरात वणवा

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळ्यात सज्जा कोठीच्या परिसरात वणवा लागला आहे. गेले तीन तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग, पन्हाळा नगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्न करत आहेत.

आज सकाळी ११ च्या सुमारास सज्जा कोठीच्या खालील बाजूस आपटी गावाच्या दिशेने धूर दिसू लागला. आगीचे लोट वाढत असल्याने चिमण्या व अन्य पक्षी या ठिकाणी घिरट्या घालत असताना पाहायला मिळत होते. जंगलात आग लागण्याची माहिती पन्हाळा नगरपालिका व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आग आटोक्यात येत नसल्याची माहिती पन्हाळा वनरक्षक संदीप पाटील यांनी दिली. पन्हाळा नागरिक देखील आग विझविण्यासाठी धावून आले, कोणी आगीवर माती टाकून तर कोणी पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. वाऱ्याच्या झोताने ही आग अजूनही वाढत असून बाजीप्रभू बुरजाकडे पसरत चालली आहे. अग्निशमन दल, वन कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button