High Protein Sprouts Salad : मोड आलेल्या कडधान्याची ‘ही’ सॅलड रेसिपी करून पहा | पुढारी

High Protein Sprouts Salad : मोड आलेल्या कडधान्याची 'ही' सॅलड रेसिपी करून पहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही जणांना कडधान्याच्या उसळ भार आवडते. काही जणांना मोड आलेली कडधान्ये अजिबात आवडत नाही. मग काय कच्ची मोड आलेलेली कडधान्ये खाणे फार लांबची गोष्ट. पण, तुम्हाला ही कडधान्ये आवडत नसतील तर कडधान्याचे टेस्टी सॅलेड बनवून खाऊ शकता. त्यामुळे तुम्हा प्रथिनांचे प्रमाण भरपूर मिळेल. शिवाय, कडधान्ये पाहून तुम्ही कधीच नाक मुरडणार नाही. तुम्ही जर वजन कमी करत असाल तर डाएटमध्ये कडधान्याचे सॅलेड हवेच.

हाय प्रोटीन स्प्राऊट सॅलड बनवण्यासाठी-

साहित्य –

मोड आलेले हिरवे मूग – एक वाटी

कांदा- १ बारीक चिऱलेला

काकडी – १ चिरलेली

हरभरे भिजवून-मुठीभर

मिरची-एक बारीक कापलेली

डाळींब दाणे- अर्धी वाटी

लिंबू – रस २ चमचे

गाजर-१ बारीक चिरलेला

टोमॅटो-१ बारीक चिरलेला

मिरी पूड – चिमुटभर

चाट मसाला – अर्धा चमचा

मीठ – चवीपुरता

साखर – चवीपुरता

कृती-

सर्वप्रथम सर्व कडधान्ये अर्धवट शिजवून घ्यावीत. ती एका मोठ्या वाटीत काढून घ्यावीत.

त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, काकडी घालावी.

वरून डाळींबाचे दाणे, मीठ, साखर, मिरी पूड घालून सर्व मिश्रण एकत्र करावे.

वरून हवा तेवढा लिंबाचा रस पिळावा.

५ मिनिटे हे मिश्रण एकजीव होऊ द्या.

जेवणासोबत हाय प्रोटिन स्प्राऊट सॅलड खायला घ्या.

Back to top button