नाशिक : बोलेरोचा भीषण अपघात; तीन तरुण ठार तर पाच गंभीर
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सिन्नर तालुक्यातील चास येथील तीन तरुण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकीतील सर्व प्रवासी तुळजापूर येथे दर्शनासाठी जात होते. बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे.
निखिल रामदास सानप (21), अनिकेत बाळासाहेब भाबड (22), अथर्व शशिकांत खैरनार (22, सर्व रा. चास ता. सिन्नर) अशी मृत तरुणांची नावे असून गंभीर जखमींमध्ये तुषार बिडगर (22) दीपक बिडगर (24, दोघे रा. चास) यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (32) पंकज रवींद्र खैरनार (30) जीवन सुदीप ढाकणे (25) व शंकर भाबड हे तरुण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातात ठार झालेले तरुण