राज्यात अवैध दारू निर्मितीचे १० कारखाने, तरीही सरकार गप्पा का ? : विजय वडेट्टीवार | पुढारी

राज्यात अवैध दारू निर्मितीचे १० कारखाने, तरीही सरकार गप्पा का ? : विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मागील २ वर्षात अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील १० प्रमुख शहरांमध्ये अवैध दारू निर्मितीचे कारखाने सापडले आहे. अवैध दारू निर्मिती करून ब्रॅण्डेड  कंपन्यांच्या नावाचे खोटी लेबल्स लावून ही दारू बाजारपेठेत सर्रास विक्री करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या मुल तालुक्यातील चित्तेगाव येथे अवैध दारू निर्मिती कारखाना सापडला आहे. त्यावर अद्यापही कोणतीही  कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात दहा बनावट दारु कारखाने आढळले,  तरी सरकार गप्पा का? असा सवाल माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. २१) अधिवेशनात केला.

माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, मुल तालुक्यांतील चितेगाव प्रकरणात मुख्य आरोपी मालकाकडून मोठे घबाड घेऊन हे प्रकरण दाबण्यात आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक न करता, कारवाईचा दिखावा करण्यासाठी इतरांना या प्रकरणात अडकवण्यात आले आहे.

अवैध दारू निर्मिती गुन्ह्यातील मुख्य आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे राज्यात अवैध दारू निर्मिती कारखाने, विक्री व वाहतूक गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस  वाढत आहे. ज्यामुळे राज्य सरकारच्या महसुलाचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे.

सदर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा  बसावा, यासाठी मुल तालुक्यातील चित्तेगाव येथील प्रकरणातील खऱ्या आरोपीवर तातडीने कारवाई करण्यात यावी. व राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने टास्क फोर्स बनवून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आज विधिमंडळात केली.

हेही वाचा 

Back to top button