पुणे: बस येरवडा पुलावरून न सोडता प्रवाशाच्या सोयीसाठी पुलाखालून सोडव्यात | पुढारी

पुणे: बस येरवडा पुलावरून न सोडता प्रवाशाच्या सोयीसाठी पुलाखालून सोडव्यात

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: येरवडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलावरून पीएमपीएलच्या बस जात असल्याने पुलाखाली बस थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. याशिवाय पूल बांधण्याअगोदर असलेले बस थांबे पुन्हा बसविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालकानी देखील सकारात्मकता दाखवली आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येरवडा येथील नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय शेजारील व बिजनेस जवळ तसेच विक्रीकर भवन बजाज अलायन्स आणि हाऊसिंग बोर्ड येथील बस स्टॉप चे शेड बांधण्यात यावे. जेणेकरून तेथील विद्यार्थी तसेच वयोवृद्ध प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल. तसेच छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे बस उड्डाण पुलावरून जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस पुलाखालून सोडण्यात याव्यात, अशा प्रकारचे निवेदन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना देण्यात आले. यावेळी रुपेश गायकवाड, जावेद इनामदार, शेखर हरणे, पॅट्रिक आंनम, प्रमोद सुरंग,दत्ता भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओमप्रकाश बकोरिया यांनी देखील सकरात्मकता दर्शवली असून बस थांबे बसविण्यात येतील. या शिवाय बस देखील पुलाखालून सोडण्यात येतील असे आश्वासन दिले.

Back to top button