ब्रेकिंग: अरुणाचल प्रदेशमध्‍ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले | पुढारी

ब्रेकिंग: अरुणाचल प्रदेशमध्‍ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

पुढारी ऑनलाईन: अरुणाचल प्रदेशमध्‍ये आज सकाळी ( दि. १६ ) भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. मंडला हिल्स परिसरात ही दुर्घटना घडली.  भारतीय लष्कराचे चित्ता हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. या हेलिकॉप्टरमधील वैमानिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( दि. १६ ) सकाळी 9.15 च्या सुमारास चीता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) शी संपर्क तुटला. दरम्यान हे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमधील बोमडिला शहराच्या पश्चिमेकडील मंडाळाजवळ कोसळले. हेलिकॉप्टरमधील वैमानिक सध्या बेपत्ता असून, या बेपत्ता वैमानिकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गुवाहाटीच्या  संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने दिल्याची पुष्टी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली आहे.

यापूर्वीही भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटना; तिघेजण वाचले

भारतीय नौदलाच्या एका अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरचा (Indian Navy Helicopter) मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला. ही घटना मुंबईतील किनाऱ्याजवळ घडली आहे. या घटनेनंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य राबवण्यात आले. या दुर्घटनेतून नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button