मनीष सिसोदियांच्‍या अडचणीत वाढ, सीबीआयने भ्रष्‍टाचार प्रकरणी दाखल केला आणखी एक गुन्‍हा | पुढारी

मनीष सिसोदियांच्‍या अडचणीत वाढ, सीबीआयने भ्रष्‍टाचार प्रकरणी दाखल केला आणखी एक गुन्‍हा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय ) दिल्‍लीचे माजी उपमुख्‍यमंत्री व ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांच्‍यावर आज ( दि. १६ ) आणखी एक गुन्‍हा दाखल केला आहे. दिल्‍ली सरकारच्‍या फीडबॅक युनिटमधील अनियमितता प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे.

सिसोदिया यांच्‍या आरोप ठेवण्‍यात आला आहे की, दिल्‍लीतील आम आदमी पार्टी सरकार २०१५ मध्‍ये फीडबॅक युनिटची स्‍थापना केली होती. या माध्‍यमातून अनेक लोकांवर पाळत ठेवण्‍यात आली होती. विशेषत: विरोधी पक्षाच्‍या नेत्‍यांची हेरगिरी कर्‍यात आली. तसेच या युनिटमधील भरतीसंदर्भात केंद्र सरकारची परवानगी घेण्‍यात आली नव्‍हती. आता याप्रकरणी सीबीआयने गुन्‍हा दाखल केला असून मनीष सिसोदिया हे पहिल्‍या क्रमाकांचे आरोपी आहेत.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button