The Elephant Whisperers : 'ऑस्कर इफेक्ट'! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याची हत्ती संवर्धनासाठी मोठी घोषणा | पुढारी

The Elephant Whisperers : 'ऑस्कर इफेक्ट'! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याची हत्ती संवर्धनासाठी मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर पुरस्‍काराचे वितरण लॉस एंजिलिसमध्ये (दि.१२ मार्च) झाले. या सोहळ्यात भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या (The Elephant Whisperers )  लघूपटाने ऑस्‍कर पुरस्‍कारावर आपली मोहर उमटवली. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत. तर दिग्दर्शक  कार्तिकी गोंझालवेस आहेत. या पुरस्कारानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी कोईम्बतूर चावडी येथे ८ कोटी रुपये खर्चून मूलभूत सुविधांसह नवीन हत्ती कॅम्प बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

मुधुमलाई टायगर रिझर्व्हमधील केअरटेकर जोडपे बोमन आणि बेली यांच्यावरील हत्ती आणि मानवाचे नातं स्पष्ट करणारा ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर तमिळनाडूचे  मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी कोईम्बतूर चावडी येथे ८ कोटी रुपये खर्चून मूलभूत सुविधांसह नवीन हत्ती कॅम्प बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सरकारने राज्यातील २ छावण्यांमधील सर्व ९१ हत्तींच्या देखभाल करणार्‍यांसाठी मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची घोषणा केली आहे. तसेच माहूतांसाठी घरे बांधण्यासाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अनामलाई व्याघ्र प्रकल्पात ‘हत्ती कॅम्प’ विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

The Elephant Whisperers

The Elephant Whisperers : हत्ती आणि मानवाचे नाते

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा लघूपट हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या बमन आणि बेला या दाम्पत्यावर आधारित आहे. लघूपटाची कथा ही हत्ती आणि त्याच्या मालकाशी असलेल्या प्रेमावर असून, निसर्गाशी जोडताना दिसत आहे. लघूपटात दोघांमध्ये असलेल्या भावनिक नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ते लोक आपल्या हत्तींशी कस खेळतात, दंगामस्ती करतात, त्याचबरोबर त्या मालकाची पत्नीही यात हत्तींशी खेळताना संवाद करताना दिसत आहे. हत्ती आणि बमन आणि बेला यांच भावनिक नात्याचं चित्रीकरण दाखवण्यात आलं आहे. हा भावनिक बंध प्रेक्षकांना प्रभावित करतो.

आजची रात्र ऐतिहासिक-गुनीत मोंगा

‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers) निर्मात्या यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल आहे की,”आजची रात्र ऐतिहासिक आहे. कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. दोन महिलांसह भारताचा गौरव होत आहे. पुढे पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे आई-बाबा, गुरुजी,  सह-निर्माता अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, अलोके, सराफिना, WME बॅश संजना.  नवरा सनी,  कार्तिकी यांचे आभार मानले आहे. जय हिंद!

हेही वाचा

 

Back to top button