The Elephant Whisperers : दुसऱ्यांदा ऑस्कर जिंकणाऱ्या Guneet Monga कोण आहेत? | पुढारी

The Elephant Whisperers : दुसऱ्यांदा ऑस्कर जिंकणाऱ्या Guneet Monga कोण आहेत?

Guneet Monga Oscars: ऑस्कर २०२३ (Oscars 2023) भारतासाठी गर्वाचे क्षण गेऊन आला. या वर्षी दोन ऑस्कर मिळाले असून यामध्ये चित्रपट ‘आरआरआर’ आणि ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ ने (The Elephant Whisperers) ऑस्कर जिंकून सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावली आगे. ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ ची निर्मिती करणाऱ्या दोन महिलांनी हॉलीवूडमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. या दोन महिला आहेत गुनीत मोंगा (Guneet Monga) आणि कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves).  (The Elephant Whisperers)

कोण आहेत गुनीत मोंगा?

भारतीय चित्रपट निर्माती गुनीत मोंगा (Guneet Monga) ने अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केलीय. गुनीत (Guneet Monga Movies) यांच्या चित्रपटांना याआधीही जगभरातील पुरस्कार मिळाले आहेत. ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ नेदेखील कमाल दाखवली आणि गुनीत (Guneet Monga Oscars) यांना ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ साठी ऑस्कर मिळाला. हा त्यांचा दुसरा ऑस्कर आहे. याआधी त्यांना डॉक्यूमेंट्री ‘पीरियड: ॲड ऑफ स्बजेक्ट’ साठी ऑस्कर मिळाला आहे.

गुनीत मोंगा (Guneet Monga Films) यांनी ‘दसवेदानियां’, ‘वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई’, ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘शाहिद’, ‘द लंच बॉक्स’, ‘मिक्की वायरस’, ‘मान्सून शूटआउट’ आणि ‘हरामखोर’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती केलीय. यापैकी अनेक चित्रपट इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले आहेत.

कोण आहे गुनीतसोबत ऑस्कर जिंकणारी कार्तिकी गोंजाल्विस?

‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ चे दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विस (Kartiki Gonsalves) ने केलं आहे. कार्तिकी चित्रपट जगताततील नवं नाव आहे. पण, ऑस्कर जिंकल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Guneet Monga Kapoor (@guneetmonga)

 

View this post on Instagram

 

A post shared by Guneet Monga Kapoor (@guneetmonga)

Back to top button