‘The Elephant Whisperers’ : ‘रघु’ला पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची ‘थेप्पाकडू’ला भेट | पुढारी

'The Elephant Whisperers' : 'रघु'ला पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांची 'थेप्पाकडू'ला भेट

पुढारी ऑनलाइन डेस्क : ‘The Elephant Whisperers’ : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटासाठी #ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर, ऑस्कर विजेत्या हत्ती रघुला पाहण्यासाठी देश-विदेशातील विविध पर्यटक थेप्पाकडू एलिफंट कॅम्पला भेट देत आहेत.

एनआयला ने दिलेल्या ट्विटमध्ये एक पर्यटक ग्रेस याने म्हटले की, “मी लंडनचा आहे, आम्ही येथे भेट दिली आणि आम्हाला कळले की येथील दोन हत्तींनी काल रात्री ऑस्कर जिंकला. त्यांना पाहून खूप आनंद झाला आणि मला ते पाहून खूप आनंद झाला. हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे. मी खूप भाग्यवान आहे. त्यांना आजच पहा,” हे सांगताना ग्रेसच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत होता.

‘The Elephant Whisperers’ : ऑस्कर पुरस्‍काराचे वितरण लॉस एंजिलिसमध्ये झाले. या सोहळ्यात भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ (The Elephant Whisperers ) ने ऑस्‍कर पुरस्‍कारावर आपली मोहर उमटवली. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार या लघूपटाला मिळाला आहे. या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी तर  दिग्दर्शक कार्तिकी गोंझालवेस आहेत. हत्ती आणि मानवामधल्या नात्याची गोष्ट सांगणारी ही डॉक्यूमेंट्री आहे.

हत्ती आणि त्याची काळजी घेणारं एक दाम्पत्य यांच्या अतुट नात्याचे बंध  ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्‍ये दाखविण्‍यात आला आहे. ‘हाऊ डू यू मेजर अ इयर?’ ,‘हॉलआउट’, ‘स्ट्रेंजर  ॲट द गेट’ आणि  ‘द मार्था मिशेल इफेक्ट’ या लघुपटांना मागे टाकत ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने  बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.
The Elephant Whisperers : हत्ती आणि मानवाचे नाते

‘The Elephant Whisperers’ : ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा लघूपट हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या बमन आणि बेला या दाम्पत्यावर आधारित आहे. लघूपटाची कथा ही हत्ती आणि त्याच्या मालकाशी असलेल्या प्रेमावर असून, निसर्गाशी जोडताना दिसत आहे. लघूपटात दोघांमध्ये असलेल्या भावनिक नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ते लोक आपल्या हत्तींशी कस खेळतात, दंगामस्ती करतात, त्याचबरोबर त्या मालकाची पत्नीही यात हत्तींशी खेळताना संवाद करताना दिसत आहे. हत्ती आणि बमन आणि बेला यांच भावनिक नात्याचं चित्रीकरण दाखवण्यात आलं आहे. हा भावनिक बंध प्रेक्षकांना प्रभावित करतो.

The Elephant Whisperers : दुसऱ्यांदा ऑस्कर जिंकणाऱ्या Guneet Monga कोण आहेत?

Oscars 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

 

Back to top button