Elon Musk : एलॉन मस्क पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती वाढली संपत्ती | पुढारी

Elon Musk : एलॉन मस्क पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्या किती वाढली संपत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या २४ तासांत मस्क यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याने एकूण संपत्ती १८७ अब्ज डॉलर झाली आहे. आतापर्यंत पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर बसलेले फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट १८५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

ट्विटर करारानंतर एलॉन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये सातत्याने मोठी घसरण होत होती. ज्यामुळे ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यावर्षी मस्क यांच्या संपत्तीमध्ये टेस्ला इंकच्या स्टॉकमध्ये जवळजवळ ७० टक्क्यांनी उडी घेतली आहे. टेस्ला स्टॉक ६ जानेवारी रोजी त्याच्या इंट्राडे नीचांकी वरून जवळपास शंभर टक्के वर आहे. टेस्लाच्या अनेक मॉडेल्सच्या कारच्या किंमती कमी केल्यानंतर, कंपनीला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उच्च मागणीचा फायदा देखील मिळाला आहे.

२०२१ पासून टॉप-१० अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या मस्क यांना डिसेंबर २०२२ मध्ये मागे टाकून बर्नार्ड अर्नॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. ट्विटर खरेदीच्या सुरुवातीपासून मस्क यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये जोरदार घसरण सुरू झाली आणि ती वर्षाच्या शेवटपर्यंत चालू राहिली. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांच्या संपत्तीत २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली. यासह त्यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

हेही वाचा :

Back to top button