Google India : आधी स्टार परफॉर्मरचा पुरस्कार नंतर दिला ‘नारळ’! गुगलने कामावरून काढलेल्या कर्मचा-याची पोस्ट व्हायरल | पुढारी

Google India : आधी स्टार परफॉर्मरचा पुरस्कार नंतर दिला 'नारळ'! गुगलने कामावरून काढलेल्या कर्मचा-याची पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Google India : सध्या टेक क्षेत्रात मंदीची मोठी लाट सुरू आहे. जगातील सर्वच दिग्गज कंपन्यांनी मंदीमुळे कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. टेक क्षेत्रातील सर्वात दिग्गज कंपनी गुगलने देखील याच मार्गाचा अवलंब केला आहे. गुगलने त्याच्या जगभरातील अनेक शाखांमधून मोठी कर्मचारी कपात केली आहे. यात गुगल इंडियाचाही समावेश आहे. गुगलने भारतातील विविध विभागांमधील सुमारे 450 कर्मचा-यांना कामावरून कमी केले. त्यापैकीच एका कर्मचा-याने एक पोस्ट करत स्वतःचे दुःख व्यक्त केले आहे आणि कंपनीला मी का? असा प्रश्न केला आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Google India गुगलमधील काढून टाकलेल्या ज्या कर्मचा-याने ही पोस्ट लिहिली आहे. तो हैदराबाद येथील एका गुगल इंडियाच्या वरिष्ठ डिजिटल मीडिया सहयोगी म्हणून काम करत होता, त्याने लिंक्डइनवर आपली पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की शनिवारी त्याला पॉप अप इ मेल नोटिफिकेशन मिळाले. तेव्हा त्याच्या काळजाचा ठोका चुकला. हा मेल गुगल ऑपरेशन सेंटरचा होता. त्याने पुढे लिहिले की गुगलने त्याला ‘स्टार’ परफॉर्मर ऑफ द मंथ हा बॅज देऊन पुरस्कृत केले होते. त्यानंतरही त्याला काढून टाकले. तसेच त्याला कामावरून कमी करण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. त्यामुळे महिनाभर स्टार परफॉर्मर असूनही मी का? असा प्रश्न त्याला पडला आहे.

Google India : कर्माचारी कपात धोरणाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला हे लिहिताना त्याने म्हटले आहे की, दोन महिन्यांचा अर्धाच पगार माझ्याकडे आहे. त्यामुळे माझे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. माझ्यासोबत हे सर्व शनिवारी घडले. आणि मला हे लिहून काढण्यासाठी दोन दिवस लागले, आता मी जगण्यासाठी पुन्हा लढा देत आहे.

लिंक्डइनवरील लोकांना त्याने कुठे चांगली संधी असेल तर सुचवा असे आवाहन त्यांनी केले आहे. तो म्हणाला, माझ्या कनेक्शनला यावर प्रतिक्रिया दिली तर मला आणखी चांगल्या संधीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल. कर्मचारी कपातीच्या या लढाईत सर्व लोकांना अंतर्गत आणि जगण्याची लढाई देखील लढण्याचा मार्ग सापडू शकेल.

Google India : हैदराबादमधील या तरुणाप्रमाणेच गुगलमधून किंवा अन्य कंपन्यांमधून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचा-यांना या टाळेबंदींने लिहिण्यास प्रवृत्त केले आहे. गुरुग्राम येथील आकृती वालिया जीने नुकतेच गुगलमध्ये 5 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला. तिलाही कशा प्रकारे कामावरून कमी केले याचे वर्णन दिले आहे. ती गुगलमध्ये क्लाऊड प्रोग्राम मॅनेजर होती. तीने म्हटले आहे जेव्हा तिच्या संगणकावर तिला प्रवेश नाकारला गेल्याचे संदेश आले त्यामुळे ती अगदीच सुन्न झाली होती.

हे ही वाचा :

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सुनावणी

Mumbai on high alert : ‘धोकादायक’ सर्फराज मुंबईत पोहोचला ‘एनआयए’चा अलर्ट : सुरक्षेत वाढ

Back to top button