Seattle : जातिभेदावर बंदी घालणारे ‘सिएटल’ हे अमेरिकेचे पहिले शहर ठरले 

Seattle : जातिभेदावर बंदी घालणारे ‘सिएटल’ हे अमेरिकेचे पहिले शहर ठरले 

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेमधील (United Statesसिएटल (Seattle)   हे शहर जातिभेदावर बंदी घालणारे पहिले शहर बनले  आहे. यासाठी सिएटल सिटी कौन्सिलच्या सदस्या क्षमा सावंत (Kshama Sawant) यांनी पुढाकार घेत एक प्रस्ताव मांडला होताय यावर मंगळवारी (दि.२२) रोजी मतदान झालं आणि हा प्रस्ताव ६-१ ने मंजूर झाला. आणि सिएटल (Seattle) हे शहर अमेरिकेतील पहिलं शहर अस बनलं आहे जिथे  जातिभेदावर बंदी घलण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी. 

Seattle : मराठी मुलीचा पुढाकार

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जातिभेदावर बंदी घालणारे अमेरिकेचे सिएटल हे पहिले शहर बनले आहे.ज्यांच्या पुढाकाराने  सिएटल शहरातील जातिभेद आणि वर्णभेदाच्या विरोधात आवाज उठवला, लढा सुरु केला, जातिभेदावर बंदी हा प्रस्ताव मांडला, त्या क्षमा सावंत या महाराष्ट्रीयन आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा तर शिक्षण मुंबईमध्ये झालं.  त्या २०१४ पासून अमेरिकेतील सिएटल सिटी कौन्सिलच्या सदस्या आहेत.  कामगार, युवक आणि पिचलेल्या समाज घटकांसाठी त्या नेहमी आग्रही राहिल्या आहेत. त्यांच्यासाठी काम करत आहेत. त्यांनी सिएटल सिटी कौन्सिलमध्ये जातीभेदावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला विरोधही झाला. मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी सिएटल शहराच्या स्थानिक परिषदेने शहरात होणाऱ्या भेदभावविरोधात मतदान केले. अखेर हा प्रस्ताव ६.१ असा ठराव पास करत मंजूर झाला. 

भारतात जातिभेद बेकायदेशीर ठरवल्यानंतरही…

क्षमा सावंत म्हणतात," भारतात जातिभेदावर बंदी असुनही जातीभेदाला बळी पडणाऱ्या घटना घडतात.  अलिकडच्या वर्षांत, अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, लोकांना देशभरात मोठ्या प्रमाणावर अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे, लोकांना कधीकधी हिंसकपणे दडपले जातं. त्या पुढे असेही म्हणतात की, सिएटलच्या प्रस्तावामूळे तेथील  भारतीय नागरिकांना याचा लाभ होऊ शकतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news