Stock Market Crash Today | शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला | पुढारी

Stock Market Crash Today | शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला

Stock Market Crash Today : कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात बुधवारी (दि.२२) घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांनी घसरला. तर निफ्टी १७,७०० च्या खाली आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्स ६०,१४३ वर तर निफ्टी १७,६६६ वर व्यवहार करत होता. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण झाली आहे. निफ्टी आयटी सुमारे १ टक्क्याने खाली आला. अदानी समूहाच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम आहे.

सेन्सेक्सवर विप्रो, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने घसरले. एल अँड टी, सन फार्मा आणि मारुती या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली. निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर टॉप लूजर होता. हा शेअर ३.७ टक्क्यांने गडगडला आहे.

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातही हीच स्थिती आहे. बाजारातील गुंतवणूकदारांना आता फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. यामुळे बुधवारी तेलाच्या किमती घसरल्या. तर सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३ पैशांनी घसरून ८२.८२ वर आला. (Stock Market Crash Today)

हे ही वाचा :

Back to top button