Raju Shetty Tweet : राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा;शेतक-यांनी जगायचं कसं…राजू शेट्टी यांचा सरकारवर निशाणा | पुढारी

Raju Shetty Tweet : राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा;शेतक-यांनी जगायचं कसं...राजू शेट्टी यांचा सरकारवर निशाणा

 पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि. २२) राज्यभर विविध ठिकाणी  शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या वीज बिलात ३७ टक्के वाढ केली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची सुलतानी कारवाई सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही. अतिवृष्टी, पीक विमा याची नुकसानभरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिली नाही. अशा विषयांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी  चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. बारावीच्या परिक्षामुळे 12 वाजलेपासून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ट्वीट करत सरकावर  निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी. ( Raju Shetty Tweet )

Raju Shetty Tweet : लाज कशी वाटली नाही 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ट्विट करत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला आहे. त्यांनी काही बिले शेअर करत म्हंटलं आहे की,” राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतक-यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा?  एका बाजूला थकबाकी पोटी शेतक-यांची वीज कनेक्शन धडाधड तोडता आणि डोळ्या समोर पीक करपून जातं. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले, ते बघा. निर्लज्ज व्यापार्याला दोन रूपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकर्यांना सांगतो १५ दिवसाने हा चेक वटेल.”

 आंदोलनातील मागण्या

  • थकीत बीलापोटी वीज जोडण्या खंडित करु नका,
  • कृषी संजीवनी योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवा,
  • शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे तातडीने द्या,
  • बुलढाणा येथे स्वाभिमानीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा,
  • सोयाबीन, कपाशी, कांदा व द्राक्ष आदी पीकांचे बाजारात भाव पडलेले आहेत ते पूर्वस्थितीत येण्यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा

आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

Back to top button