Climate risk : जगातील टॉप ५० राज्यांमध्ये भारतातील नऊ राज्यांना हवामान बदलाचा सर्वाधिक धोका | पुढारी

Climate risk : जगातील टॉप ५० राज्यांमध्ये भारतातील नऊ राज्यांना हवामान बदलाचा सर्वाधिक धोका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील नऊ  राज्यांना हवामान बदलाचा सर्वाधिक धोका आहे. एका नवीन अहवालात हे स्पष्ट झाले आहे.  हवामान बदलाच्या बाबतीत जगातील सर्वात धोकादायक ५० राज्यांमध्ये भारतातील या ९ राज्यांचा समावेश आहे. या ९ मध्ये भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ यांचा समावेश आहे. हा अहवाल क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह (Cross Dependency Initiative XDI) ने २०५० हे वर्ष लक्षात घेऊन एक अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये जगातील 2,600 राज्ये आणि प्रदेश समाविष्ट आहेत. वाचा सविस्तर बातमी. (Climate risk)

क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह (Cross Dependency Initiative XDI) ने २०५० हे वर्ष लक्षात घेऊन एक अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये जगातील २,६०० राज्ये आणि प्रदेशांचा समावेश आहे.  हा अहवाल हवामानातील बदल, पर्यावरण, मानवी कृती आणि घरांपासून इमारतींपर्यंत होणाऱ्या नुकसानीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. या आधारे ही क्रमवारी काढण्यात आली आहे. या राज्यांना धोका म्हणजे काय तर वाढत्या धोक्यांमध्ये पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट, समुद्राची वाढती पातळी यांसारख्या घटनांचा समावेश आहे.

Climate risk : भारतातील १४ राज्ये पहिल्या १०० मध्ये 

क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह (XDI) ने  सादर केलेल्या अहवालात पहिल्या १०० देशांमध्ये भारतातील १४ राज्ये आहे. ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. पाहा कोणती राज्ये धोक्याची घंटा दर्शिवते. (राज्याचे नाव आणि १०० देशांमधील त्यांचा क्रमांक)

  • बिहार – २२
  • उत्तर प्रदेश – २५
  • आसाम – २८
  • राजस्थान – ३२
  • तामिळनाडू – ३६
  • महाराष्ट्र – ३८
  • गुजरात – ४४
  • पंजाब – ४८
  • केरळ – ५०
  • मध्य प्रदेश – ५२
  • प. बंगाल – ६०
  • हरियाणा – ६२
  • कर्नाटक – ६५
  • आंध्र प्रदेश – ८६
  • जम्मू-काश्मीर – १०४
  • हिमाचल – १५५
  • दिल्ली – २१३
  • उत्तराखंड – २५७

इतर देशांमध्ये काय आहे परिस्थिती

पाकिस्तान : २०२२ मध्ये झालेल्या पुराने पाकिस्तानचा ३०% भाग व्यापलेला होता. एकट्या सिंधमध्ये सुमारे ९ लाख घरे उद्ध्वस्त झाली होती. हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असलेल्या १०० राज्यांमध्ये पाकिस्तानमधील पंजाब, सिंध आणि केपीके (Khyber Pakhtunkhwa) यांचा समावेश आहे.

चीन : हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असलेल्या २० राज्यापैकी १६ सर्वात धोकादायक राज्ये ही चीनमधील आहेत. त्यामध्ये जिआंगशू, शेंडोंग, हेबेई, ग्वांगडोंग, हेनान, झेजियांग, अनहुई, हुनान, शांघाय, लिओनिंग, जिआंग्शी, हुबेई, टियांजिन, हेलोंगजियांग, सिचुआन आणि गुआंगक्सी यांचा समावेश आहे.

अमेरिका : अमेरिकेमधील फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि टेक्सास हे टॉप २० मध्ये आहेत. टॉप १०० मधील राज्यांचा विचार करता १०० मध्ये १८ राज्ये अमेरिकेची आहेत.

Climate risk

हेही वाचा

Back to top button