Greta Thunberg : ‘हवामान संरक्षण करणे हा गुन्हा नाही’ : ग्रेटा थनबर्ग | पुढारी

Greta Thunberg : 'हवामान संरक्षण करणे हा गुन्हा नाही' : ग्रेटा थनबर्ग

पुढारी ऑनलाईन डेस्क : पर्यावरण चळवळकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) बुधवारी (दि. १८) तिची चळवळ पुन्हा सुरु केली आहे. जर्मनीमधील कोळसा खाणीच्या विस्ताराविरोधातील तिने आवाज उठविला आहे. तिच्या समुहाने या विस्ताराविरोधात झपाट्याने प्रचार सुरू केला आहे. तसेच तिने एक ट्विट देखील केले आहे ज्यामध्ये ती म्हणते की, हवामानाचे संरक्षण करणे हा गुन्हा नाही.

ग्रेटा (Greta Thunberg)  तिच्या ट्विटमध्ये म्हणते की, ”कालपर्यंत मी जर्मनीतील एका अशा समुहाचा भाग होते, जो शांततेमध्ये कोळसा खाणीविरोधात आवाज उठविणारा होता. याच विषयावर बोलणाऱ्या आमच्या समुहावर पोलिसांनी निर्बंध आणले आहेत. आवाज उठविल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र काही वेळांनी सोडूनही दिले.”

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खुलेआम सुरु असणाऱ्या RWE च्या मालकीच्या कोळसा खाणीच्या विस्तारामुळे लुएत्झेराथ गाव उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. या गावाच्या रक्षणार्थ आता ग्रेटाने पाऊल उचलले आहे. या कामाच्या अतिक्रमणाविरोधात निदर्शने तिने केली आहेत. ही निदर्शने करणाऱ्या इतर सर्व कार्यकर्त्यांसह तिला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा

Back to top button