Shooting in America: अमेरिकेत पुन्हा गोळीबार! एकाचा मृत्यू; एका संशयिताला अटक

पुढारी ऑनलाईन:अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुन्हा एकदा उघड गोळीबार झाला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. टेक्सासमधील एल पासो येथे एका बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून चार जणांवर गोळीबार केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त द असोसिएट प्रेसने (AP) दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. याशिवाय आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती येथील पोलिसांनी दिली आहे.
गोळीबार केल्याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या घटनेत आणखी एकाचा सहभाग असल्याचा संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. एल. पासो पोलिसांनी ट्विटमध्ये सांगितले की, हा हल्ला सिलो व्हिस्टा मॉलच्या फूड कोर्टमध्ये झाला. त्यांनी लोकांना मॉलपासून दूर राहण्याचा इशारा दिला. असे सांगण्यात आले की, हा मॉल वॉलमार्टच्या अगदी जवळ आहे जिथे 2019 च्या गोळीबाराच्या घटनेत 23 लोक मारले गेले आणि दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेतील एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, त्याने मॉलमध्ये अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला आणि अनेक लोक मॉलमधून बाहेर पळताना पाहिले.
BREAKING: Police in El Paso, Texas, say one person was killed and three other people were wounded in a shooting Wednesday. The shooting happened near a Walmart where 23 people were killed in a racist attack in 2019. https://t.co/pkLgHBia6I
— The Associated Press (@AP) February 16, 2023
अमेरिकेतील टेक्सास शहरातील मटलमध्ये अंदाधुंद गोळीबार केलेल्या दुसऱ्या व्यक्तीला देखील ल पासो पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचे वृत्त द असोसिएट प्रेसने (AP) ट्विट करून दिले आहे.
Police in El Paso, Texas, say a second person has been taken into custody following a shooting at a shopping mall that left one person dead and three other people wounded. https://t.co/sYgvc9yrE0
— The Associated Press (@AP) February 16, 2023
हेही वाचा:
- Turkey Earthquake: तुर्कीत अन्न-पाण्यासाठी संघर्ष; मृतांचा आकडा 41 हजारांहून अधिक
- Pakistan economic crisis | पाकिस्तानात महागाईचा आगडोंब! पेट्रोल प्रति लिटर २७२ रुपये, केरोसीन २०२ रुपयांवर
- Crypto investment : ‘क्रिप्टो’ गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्सी कंपनीकडून ७४ लाखांची फसवणूक