अ‍ॅड. गौरी यांच्या बढतीला आक्षेप घेणाऱ्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार | पुढारी

अ‍ॅड. गौरी यांच्या बढतीला आक्षेप घेणाऱ्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. एल. व्हिक्टोरिया गौरी यांची बढती करण्यात आली होती. त्याला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखविली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारधीवाला यांचे खंडपीठ ७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी घेईल.

अ‍ॅड. गौरी यांच्या बढतीसंदर्भातील याचिकेवर तात्काळ सुनावणी घेणे गरजेचे असल्याचा मुद्दा अ‍ॅड. राजू रामचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला. मद्रास उच्च न्यायालयातील अनेक वरिष्ठ वकिलांचा अ‍ॅड. गौरी यांच्या बढतीला विरोध असल्याचे रामचंद्रन म्हणाले. अ‍ॅड. गौरी या भाजपशी संबंधित असून मुस्लिम तसेच ख्रिश्चन लोकांविरोधात त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली असल्याचे मद्रास उच्च न्यायालयातील काही वकिलांचे म्हणणे आहे. वकिलांच्या एका समुहाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमला तसेच राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, असेही रामचंद्रन यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button