नाशिक : सत्यजित तांबे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर | पुढारी

नाशिक : सत्यजित तांबे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या निम्म्या मतांनी पिछाडीवर आहेत.  सत्यजित तांबे हे 15 हजार 785 मते मिळून पहिल्या फेरीतच प्रथम क्रमांकावर आले आहेत.  नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला फेरीचा मतदानांनी दिलेला कल जाहीर झाला असून नाशिक पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीचे निकाल घोषित झाले आहेत. 15,785 मतदान घेत अपक्ष सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर शुभांगी पाटील यांना 7,862 मते मिळाली आहेत. तांबे आणि पाटील यांच्यात 7,922 मतांनी आघाडी घेतली आहे. पहिली फेरीत एकूण 28,000 मते मोजली गेली आहेत. त्यामध्ये 25,259 मते वैध ठरली आहेत तर अवैध मतांचे पारडे 2,741 इतके आहे. त्यामुळे पहिल्या फेरीनंतरचे पुढील चित्र काय असेल याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

Back to top button