नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर | पुढारी

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांबे यांना 15 हजार 782 मते मिळाली आहेत. तब्बल दहा टक्के मते बाद झाली आहेत.

नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला कल जाहीर झाला. त्यानुसार अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना 15 हजार 774 मते मिळाली असून त्यांनी पहिल्याच फेरीत 8 हजार 266 मतांची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तांबे यांच्यापेक्षा निम्मी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत त्यांना अवघी 7 हजार 508 मते मिळाली असल्यामुळे त्या पिछाडीवर आहेत.

 

Back to top button