नाशिक : ट्रकचालक तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून | पुढारी

नाशिक : ट्रकचालक तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन खून

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे महामार्गालगत धोंडवीरनगर शिवारातील अन्नपूर्णा हॉटेलजवळ बुधवारी (दि. 1) रात्री 8 च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. संपत रामनाथ तांबे (32, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे मृताचे नाव असून तो खासगी ट्रकचालक होता. अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन संपत याचा खून केल्याचे समोर आले असून घटनास्थळी मृत तरुणाची दुचाकी व छोटीसी तलवार आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संपत तांबे हा ट्रकचालक असल्याने अनेकदा परराज्यात ट्रक घेऊन जात असे. बुधवारी रात्री सव्वासातच्या सुमारास 108 रुग्णवाहिकेला अपघातात जखमी झालेला युवक रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याबाबत फोन आला. माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button